महानायक अमिताभ बच्चन यांना पुन्हा कोरोनाची लागण

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: बच्चन यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. माझा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी त्यांची टेस्ट करून घ्या असं आवाहन अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.

विशेष बाब म्हणजे अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली. यापूर्वी जुलै २०२० मध्ये त्यांना कोरोनाची लागण जाली होती. तेव्हा त्यांच्या सोबत त्यांचे पुत्र आणि अभिनेता अभिषेक बच्चनला सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यावेळी अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन, सून ऐश्वर्या रॉय बच्चन यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला होता.

Share