शरद पवारांवर बोलणाऱ्यांना आता कसं वाटतंय? दिपाली सय्यद यांनी मनसेला पुन्हा डिवचलं

मुंबई : राज्यात सध्या सोशल मीडियावर राष्ट्रवादीचे काॅँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे उत्तरप्रदेशातील खा. बृजभूषण सिंह यांचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमुळे शरद पवार यांनीच राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द करण्यासाठी रसद पुरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान आता मनसे आणि राष्ट्रवादीच्या वादात शिवसेनेनेही उडी घेतली आहे. शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्याद यांनी ट्विट करत मनसेला डिवचलं आहे. त्यांनी राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो ट्विट करत शरद पवारांवर बोलणाऱ्यांना आता कसं वाटतंय?, काही सूत्र जुळतात का?, असा सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केलेलं ट्विट चांगलचं चर्चेत आलं आहे. राज ठाकरे राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजप आपला वापर करून घेतंय, हे कसं कळत नसेल?, असं रोहित पवार म्हणाले. तसेच बृजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेनं बघावं, असं म्हणत आगामी महापालिका निवडणुकीत ते मुंबईत प्रचाराला आले तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

Share