राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर … अयोध्या दौऱ्यापूर्वी मनसेची मुंबईत पोस्टरबाजी

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पाच जून रोजी अयोध्य दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याची घोषणा झाल्यापासूनच राजकीय वर्तुळात पडसाद उमटत आहे. अशातच राज ठाकरे यांच्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध दर्शविला आहे. राज ठाकरे यांनी प्रथम उत्तर भारतीयांची माफी मागावी, त्यानंतर अयोध्येत पाऊल ठेवावे, अशी मागणी बृजभूषण सिंह यांनी लावून धरली आहे.

यावर आता मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल असा इशारा मनसेने दिला आहे. यासंदर्भातले बॅनर मुंबईतल्या लालबाग परिसरात लावण्यात आलेले आहेत. या बॅनरमुळे आता मनसेही उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचं पाहिला मिळतंय.

 

दौऱ्यासाठी मनसेची जय्यत तयारी
राज ठाकरे येत्या ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने मनसे अयोध्या आणि शरयू नदीकाठी शक्तिप्रदश्न करण्याची शक्यता आहे. या दौऱ्यासाठी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते अयोध्येत दाखल होणार आहेत. यासाठी मनसेतर्फे १० ते १२ रेल्वे गाड्या बूक करण्यात आल्या आहेत. दौऱ्याआधी मनसेचं एक शिष्टमंडळही अयोध्येला रवाना होणार आहे.

Share