नैरोबी-केनियालाही ग्रामपंचायत निवडणुका झाल्या तर तिथंही भाजपा दावा करेल

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीतील निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. आज सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली असून आतापर्यंत अनेक ठिकाणचे निकाल हाती आले आहेत. यात भारतीय जनता पार्टी सर्वाधिक ग्रामपंचायती जिकंले असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवणीस यांनी केले आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यांशी बोलत होते.

खासदार संजय राऊत म्हणाले की, ग्रामपंचायतीचा दावा कधीच कुणी करू नये. कारण जिथं पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या जातात तिथंच पक्षांनी दावा करावा. ग्रामपंचायतीच्या निवडणुका कशा लढवल्या जातात हे आता काही नव्यानं सांगण्याची गरज नाही. आता नैरोबी आणि केनियामध्येही ग्रामपंचायत निवडणूक झालीय तिथंही भाजपा दावा करेल, असा दावा करेल अशी टिकाही राऊतांनी केली.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आहे. मी आजच तुम्हाल सांगतो, लिहून घ्या तुम्ही की महाराष्ट्रात पुन्हा नंबर वन भारतीय जनता पार्टीच राहील. कोणी काहीही नरेटीव्ह केलं तरी आपल्याला रेकॉर्डब्रेक जागा मिळतील. कोणी काहीही काळजी करु नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

Share