आमदार गोपीचंद पडळकरांच्या मातोश्री सरपंचपदी विजय!

सांगली :  भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये विजय झाल्या आहेत. पडळकरवाडी ग्रामपंचायतवर आ. गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आली आहे. निवडणुकीत ७ सदस्य हे ग्रामपंचायत सदस्यपदी विजयी झाले आहेत. तर सरपंच पदी गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर या ३०० मतांनी निवडून आल्या आहेत.या विजयानंतर आटपाडी मध्ये जल्लोष करण्यात आला आहे.

पडळकरवाडीमध्ये प्रमुख कार्यकर्ते, नेत्यांची नोव्हेंबरमध्ये बैठक देखील पार पडली होती. ज्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई कुंडलिक पडळकर यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड करण्याचा निर्णय घेण्यात आलेला. पण तालुक्यातील निवडणुका चुरशीच्या बनल्यानं पडळकरवाडीतही सरपंच पदासाठीही निवडणूक लागली.

गोपीचंद पडळकर हे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. तसेच भाजपचे स्टार प्रचारक देखील आहेत. त्यांचे बंधू ब्रह्मनंद पडळकर हे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि आता पडळकरवाडी या त्यांच्या गावामध्ये सरपंच म्हणून त्यांच्या मातोश्री हिराबाई कुंडलिक पडळकर विराजमान झाल्या आहेत.

Share