जर अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही – भरत गोगावले

मुंबई : राज्य विधिमंडळ पाचव्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी आपल्याला शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. तर भरत गोगावले यांनी, ते कसले धक्काबुक्की करतायत, आम्हीच केली, पुन्हा आमच्या अंगावर आले तर शिंगावर घेऊ, असा इशारा प्रसारमाध्यमांशी बोलताना गोगावले  यांनी दिला आहे.

भरत गोगावले म्हणाले कि, कोव्हिडच्या काळापासून त्यांचा इतिहास आम्ही बाहेर काढला. त्यांची वस्तुस्थिती आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. आम्ही जसाच तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुले आमचा नाद करायचा नाही. त्यांनी आमचा चुकून पाय लागला तर त्यांना आम्ही नमस्कार करेन. पण त्यांचा पाय लागला तर आम्ही त्याला सोडत नाही अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला. गद्दार गद्दार म्हणून आरोप करत आहेत. जे आम्ही केलं ते आमच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं की बॅनरबाजी करायचं. ते जेव्हा घोषणाबाजी करत होते. तेव्हा आम्ही आलो नाही. ते किती आहेत ते तुम्हाला माहिती आहे. आम्ही १७० लोको त्यांच्या आंदोलनाला आलो असतो तर तुम्हाला समजलं असत. आम्ही काय बोलत होतो तेव्हा त्यांनी यायला नको होतं. याच अर्थ त्यांना झोंबलं. मिरची जशी चावल्यानंतर झोंबते तशी त्यांना झोंबली. कारण त्यांचा आम्ही इतिहास बाहेर काढला.

आम्ही बोलताना त्यांनी येऊन पायऱ्यांवर गोंधळ घालायचा हा कुठला प्रकार आम्ही काय बांगड्या भरल्यात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही जसात तसे उत्तर त्यांना आम्ही दिले आहे. धक्काबुक्की बद्दल विचारल्यानंतर येवढ्या गर्दी मध्ये होते आम्हीपण ढकलल. जे आमच्याकडे आले त्यांना आम्ही सरळ मार्गाने सोडू असा उलट सवाल त्यांनी उपस्थित केला.

सत्तेत त्यांच्यासोबत असताना आम्ही खायला नव्हतो काम करायला होतो. ते घरात बसून काम करत होते. आम्ही फिल्डवर काम करत होते. म्हणून आम्ही सहसलामत इथे उभे आहेत. धक्काबुक्कीच्या घटनेवर बोलताना ते म्हणाले, हा फक्त ट्रेलर होता पिक्चर अभी बाकी आहे. त्यांनी तुम्हाला धक्काबुक्की केली का असा सवाल उपस्थित केल्यानंतर ते म्हणाले, अरे हट ते काय आम्हाला धक्का बुक्की करणार आम्ही त्यांना धक्काबुक्की करणार असा इशाराही गोगावेलेंनी दिला,

Share