काँग्रेसने देशाचं वाट्टोळं केल्याबद्दल माफी मागावी- फडणवीस

मुंबई-  मुंबईसह राज्यात काँग्रेस आंदोलन करत आहेत तर, दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आशिष शेलार, प्रसाद लाड, कृपाशंकर सिंग, मंगलप्रसाद लोढा उपस्थित होते. फडणवीसांच्या सागर निवासस्थानाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनासाठी पोहोचले असताना काही भाजपा कार्यकर्तेही त्यांच्या भेटीसाठी आले होते. यावेळी या कार्यकर्त्यांनी फडणवीसांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. दरम्यान फडणवीसांनी या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मोठं विधान केलं आहे.

नुकताच फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “नाना पटोलेंनी कितीही नोंटकी केली तरी काही उपयोग होणार नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. याउलट काँग्रेसनंच देशाची मागी मागितली पाहिजे”, अंस फडणवीसांनी म्हटलंय.

Share