आमदारांना घरे मोफत देणार नाहीच, तर…

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधानसभेत म्हाडाच्या घरांसाठी येणाऱ्या अडचणी दूर करणार. तसेच, ग्रामीण भागातील ३०० आमदारांसाठी मुंबईत घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर राज्यभरात आमदारांना घरं का द्यावी याबद्दल उलटसुलट चर्चा रंगली होती. दरम्यान राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की,सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च ७०लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे. अशी माहिती जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत दिली आहे.

दरम्यान , आमदारांना घरं देण्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. आमदारांना घर कशाला हवं आहे. कुणी आमदार व्हायला नारळ दिला नव्हता. मी म्हणतो घर कशाला हवे.या लोकाना रोज डिप्लोमेसी करावी लागत आहेत. मुळात महाविकास आघाडीचे आमदार फुटू नये म्हणून ही घोषणा केली आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

Share