मर्द असाल तर मला तुरुगांत टाका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असल्याने मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टिका केली. यावेळी केंद्रीय तपास यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. दुसऱ्यांना वाईट म्हणण्याआधी स्वत:कडे पाहिलं पाहिजे. तुम्हाला सत्ता पाहिजे ना? मी येतो तुमच्यासोबत. पण सत्तेसाठी नाही. मर्द असाल तर मला तुरुगांत टाका. कुटुंबाशी काय खेळता? कुटुंबीय आणि शिवसैनिकांना त्रास देण्यापेक्षा मी आज तुम्हाला सांगतो. हिंमत असेल तर माझ्याशी लढा आणि मी तुमच्यासोबत येतो मला तुरुंगात टाका, असा हल्लाबोल मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी विरोधकांवर केला.

ईडीच्या करावाईनंतर मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंनी विधानसभेत विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. ईडी आहे की घरगडी अशा शब्दांत त्यांनी ईडीच्या कारवाईच्या समाचार घेतला. आम्ही सगळे भ्रष्टाचारी आहोत, दाऊदची माणसं आहोत मग सकाळच्या सत्तेचा प्रयत्न सफल झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले नसते का? आम्ही जर तुमच्या कुटुंबात पट्टा बांधला तर आमच्या कुटुंबाची बदनामी करता जी नीच आणि निंदनीय आहे.  मर्द असाल तर या मर्दासारखा अंगावर, सत्तेचा दुरउपयोग करून समोर येतात. शीखंडीला लढण्याची ताकद नव्हती, त्याला मध्ये टाकलं. आता शीखंडी कोण आहे आणि मर्द कोण आहे, हेच कळत नाही. कोण कुणाच्या मागून लढत आहे. हिंमत असेल तर समोरासमोर या, नामर्दासारखे लढू नका. यंत्रणा वापरायच्या कुटुंबीयांना बदनाम करायचे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

Share