रावणाचा जीव बेंबीत होता, काहींचा जीव मुंबईत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असल्याने मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टिका केली आहे. रावणाचा जीव जसा बेंबीत होता. मात्र काही जणांना केंद्रात सरकार मिळाले तरी त्यांचा जीव मुंबईत आहे. असा टोला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात आज निवेदन सादर करत विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधाला मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील परिस्थिती न पाहता तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. राम आणि रावणच्या गोष्टीसारखी परिस्थिती आहे. रावणाचा जीव जसा बेंबीत होता त्याचप्रमाणे अनेकांना केंद्रात सत्ता मिळाली पण जीव मात्र मुंबईत आहे. आठ भाषांत शिक्षण देणारी एकमेव मुंबई महापालिका आहे. कोविड संदर्भात अनेक ठिकाणी कौतुक करण्यात आले.  कोविड बरा झाला पण ज्यांना द्वेषाची कावीळ झाली असेल तर काय करणार? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला आहे.

Share