मला काळजी वाटते,राज्याचे राजकारण कोणत्या थराला चालले-फडणवीस

मुंबई : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी रविवारी दूरदृष्य प्रणालीव्दारे संवाद साधला.  या संवादात उद्वव ठाकरे यांनी भाजवर टिका केली आहे. त्यांच्या या टिकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिल आहे. मुंबई आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

फडणवीस बोलताना म्हणाले की, सोयीचा इतिहास आणि निवडक विसरणं या दोन गोष्टी प्रामुख्याने उद्धव ठाकरेंच्या भाषणात पहायला मिळाल्या. २५ वर्ष आम्ही युतीत सडलो असं ते म्हणाले. पण २०१२ पर्यंत या युतीचे नेते हे स्वत: वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते. या युतीचा निर्णय त्यांनी केला होता. त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का? भाजपासोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी सडत ठेवलं का? असा विचार आमच्या मनात येत आहे. असं फडणवीस यावेळी म्हणाले.

दरम्यान फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत म्हंटल की सत्ता आणि पैशाचा दुरुपयोग जितका महाराष्ट्रात झाला, मला काळजी वाटते , महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या थराला चालले आहे याची मला चिंता वाटते आहे.

Share