मंजुळेंचा ‘झुंड’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबईः नागराज मंजुळेचा ‘झुंड’ चित्रपट संध्या चर्चेत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक चित्रपट रिलिज झाले नाही . मागिल काही दिवसांन पासून नागराज मंजुळे यांचा झुंड चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार असल्याची चर्चा सुरू होती . मात्र हा चित्रपट कुठे रिलीज होणार हे नागराज मंजुळे यांनी स्पष्टच केल आहे.

देशात कोरोना संक्रमण असल्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे. असेच मत नागराज मंजुळे यांच आहे. झुंड या चित्रपटाची अनेकजण वाट पाहत आहेत, कारण त्या अमिताभ बच्चन यांनी काम केले आहे. मात्र योग्य वेळ आल्यानंतर झुंड चित्रपट आम्ही रिलीज करू असे स्पष्ट केले आहे. सद्या सुरू असलेल्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. हा चित्रपट थिअटरला रिलीज व्हावा अशी माझी इच्छा आहे, त्यामुळे योग्यवेळी तो रिलीज करण्यात येईल असे मंजुळेंनी सांगितले.

या चित्रपटात नेमक्या किती भूमिका आहेत, तसेच अमिताभ बच्चन यांच्यासोबत पहिल्यांदा काम केलंय, त्यामुळे लोकांची उत्सुकता वाढली आहे. आत्तापर्यंत मराठी अनेक चित्रपट हीट देणा-या मंजुळे यांच्या हिंदी चित्रपटात वेगळे काय पाहायला मिळणार याकडे सगळ्याचे डोळे लागले आहेत. कोरोनाचे संक्रमण कमी झाल्यानंतर हा चित्रपट तुम्हाला थिअटरला बघायला मिळेल.

Share