पाच राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ

दिल्ली- गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेसने या देशावर वर्चस्व गाजवलं होतं. २०१४ पासून मात्र काँग्रेस दूसऱ्या स्थानावर गेली होती. २०१९नंतर पहिल्यांदाच पाच राज्याच्या निवडणूका झाल्या आहेत. या पाचही राज्याच्या निकालावर संपूर्ण देशाचं लक्ष लागून होतं. त्यासाठी सर्व पक्षांनी कस लावला होता. आज या निवडणूकाच्या मतमोजणीला सुुरुवात झाली असून यात काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याच दिसून येत आहे.

उत्तरप्रदेशात काँग्रेसने केवळ ३ जागांवर आघाडी मिळवली आहे .तर मणिपूर आणि गोवा प्रत्येकी ३ आणि ११ जागी आघाडी वर आहेत. काँग्रेसला फक्त उत्तराखंडमध्ये चांगली कामगिरी केली असं म्हणाव लागेल. उत्तराखंड येथे काँग्रेसला २४ जागांवर आघाडी मिळवता आली आहे.

२०१७ साली पंजाबमध्ये काँग्रेसने सत्तास्थापन केली होती मात्र यावेळेस आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये चांगलीच मुसंडी मारली आहे. पंजाबमध्ये आपचे ९० उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांची वाटचाल बहुमत मिळाल आहे.पंजाबमध्ये जनतेनं काँग्रेसला नाकारल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे भविष्यात काँग्रेसची जागा आप घेणार का असा प्रश्न निर्माण होतं आहे.

त्याचबरोबर विधानसभेच्या ४० जागा असलेल्या गोवा राज्यात देखील भाजप आघाडीर असल्याचे दिसत आहे. सुरुवातीला गोव्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात काँटे की टक्कर होती. मात्र, ता भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपने १९ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रसने ११ जागांवर आघाडी घेतली आहे.

Share