प्रस्थापितांना नाकारुन पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला – मनसे

मुंबई : देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार असून सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.  पंजाबमधील सर्व जागांचे सुरुवातीचे कल जाहीर झाले आहेत. आम आदमी पक्षाने काँग्रेसला धक्का देत, जोरदार मुसंडी मारली आहे.  याच पार्श्वभूमीवर  मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर  यांनी ट्विट केले आहे. प्रस्थापितांना नाकारुन पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच पर्याय उपलब्ध असतात, फक्त डोळे उघडे ठेवावे लागतात, असेही अमेय खोपकर यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

दरम्यान, पंजाब विधानसभा निवडणूक निकालात आम आदमी पार्टीने प्रस्थापितांना धक्का देत मोठे यश प्राप्त केले आहे. पंजाबमधील स्थानिक पक्षांना नाकारत, तसेच प्रस्थापितांविरोधात मतदान झाल्याचा कौल सुरुवातीच्या कलांमध्ये दिसून आला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. कॉंगेसचे अनेक दिग्गज नेते पिछाडीवर आहेत. तसेच शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल देखील पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

Share