‘लंडनच्या राणीच्या घरी, जाधवांची स्वारी!’, ‘दे धक्का २’ आज पासून चित्रपटगृहात

 मुंबई :   महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘दे धक्का २ ’ आज चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदा जाधवांची स्वारी थेट लंडनमध्ये दाखल होणार आहे. . ‘दे धक्का २’ हा ‘दे धक्का’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. पहिल्या चित्रपट ज्याप्रमाणे धम्माल आणि तितकाच काळजाला हात घालणारा होता, त्याप्रमाणे ‘दे धक्का २’ चित्रपटाकडून चाहत्यांना फार अपेक्षा आहेत. ‘दे धक्का २’ चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे.

दे धक्का २’ चित्रपटात सर्वाचा मॉर्डन अवतार पाहायला मिळणार आहे. अभिनेता मकरंद अनासपुरे आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव या हास्यवीरांची जोरी हसवून हसवून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणेल एवढं नक्की. चित्रपटाच्या पोस्टर रिलीजपासून चाहत्यांना या चित्रपटाची उत्कंठा लागली आहे.

De Dhakka 2 finally has a release date – 5 August

‘दे धक्का’ हा चित्रपट २००८ साली चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. अनेकदा चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुलचे बोर्ड लागलेले दिसून आले होते. ‘दे धक्का’मध्ये शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर, गौरी वैद्य, सचित पाटील या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाचा पहिला भाग अतुल काळे आणि सुदेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केला होता. तर, महेश मांजरेकरांनी या चित्रपटाचे लेखन केले होते.

De Dhakka 2 New Poster Released On The Occasion Of Ashadhi Ekadashi | De  Dhakka 2 : 'आज पंढरीची वारी, 5 ऑगस्टला लंडनवर स्वारी!', 'दे धक्का 2'चं नवं  पोस्टर पाहिलंत का?

यंदा होणार थेट ‘लंडन’वारी!

यावेळेस ही धमाल ट्रीप मुंबई-कोल्हापूर नाही तर, कोल्हापूर ते थेट लंडन असणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. पोस्टरमध्ये लंडनची झलक पाहून यंदा धमाल आणि मनोरंजनाचा मोठा डोस प्रेक्षकांना मिळणार आहे, हे लक्षात येते.

Share