राज्यातील अनेक भागात पहाटे भोंग्याविना अजान

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या यांनी सरकारला मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी आज म्हणजेच ४ मे रोजीपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. अन्यथा मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणी पहाटेची अजान भोंग्याविना झाली आहे. पंढरपूर, मनमाड, कल्याण-डोंबिवली तसेच मुंबईच्या काही भागात भोंग्याविना अजान झाली. यावेळी मशिद, मंदिरांच्या बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.

मनसे नेत्यांकडून निर्णयाचा स्वागत

मनसे नेते संदिप देशापांडे म्हणाले की, आज अजान बऱ्याच ठिकाणी वाजली नाही. मुस्लिम बांधवांच्या या भूमिकेचं मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. त्यांनी हा विषय धार्मिक न मानता सामाजिक समजून राज ठाकरेंच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. ज्या पद्धतीनं खोटा प्रचार राज ठाकरेंबाबत केला, त्याला मुस्लिम बांधवांनीच उघड पाडलं राज ठाकरेंनी सामाजिक मुद्दा चर्चेला आणला आणि त्याचा आता निकाल लागलेला दिसतोय राज ठाकरेंच्या आवाहनाला मुस्लिम बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला मुस्लिम बांधवांनी जो समजसपणा दाखवला तो कौतुकास्पद आहे.

Share