भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्याल’याचं मुख्यमंत्राच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : ‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालया’साठी तात्पुरत्या स्वरूपात पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाटय़ मंदिर येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल या महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयासाठी काहीही कमी पडणार नाी. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,दीदी आपल्या सोबत नसल्या तरी आपल्या सोबत कायम आहेत. एक दैवी शक्ती त्यांच्यात होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. लता दीदींचा आवाज कानावर पडत नाही असा एकही दिवस जात नाही. असे सांगून त्यांनी स्वरमाऊलीला अभिवादन केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगातील प्रत्येकाचं लक्ष वेधेल असं आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय बनवण्यात येत आहे. दीदी सर्वांना भुरळ घालणाऱ्या होत्या. ईश्वराचा अंश दिदींमध्ये आपल्याला जाणवायचा. त्यांच्या नावाने आता काम करण्याची संधी मिळते यापेक्षा मोठी गोष्ट काही नाही, अशी ग्वाहीदेखील उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी त्यांचा जीवनपट उलगडणाऱ्या ‘सम्राज्ञी’ माहितीपटाच्या निर्मितीची घोषणा अनुष्का मोशन पिक्चर्स, एन्टरटेन्मेट व लतिका क्रिएशन्स यांनी केली. ‘एल. एम. म्युझिक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मयूरेश पै आणि निर्माते नरेंद्र फिरोदिया हे त्याची निर्मिती करणार आहेत.

Share