दीड तासानंतर टीम इंडियाला मिळाली विकेट
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना आजपासून धरमशाला येथे खेळला जात आहे.
इंग्लंडला पहिला धक्का 64 धावांवर बसला आहे. कुलदीप यादवच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात डकेट झेलबाद झाला. शुभमन गिलने मागे धावताना डकेटचा अप्रतिम झेल घेतला. सध्या ओली पोप मैदानात आले आहेत. जॅक क्रॉली 37 धावा करून क्रीजवर आहे.
टीम इंडिया सध्या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. आता रोहित शर्मा आणि कंपनीची नजर धरमशाला कसोटीवर आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
या सामन्यात देवदत्त पडिक्कलने पदार्पण केले आहे. त्याचवेळी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात पुनरागमन झाले आहे. चौथ्या कसोटीत त्याला विश्रांती देण्यात आली होती.