आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही- राऊत

प्रकाश आंबेडकरांबरोबर आमची चर्चा उत्तम झाली

वंचितसोबतच्या बैठकीत काहीच घडलं नाही हे सांगणं बरोबर नाही. वंचितच्या बाबतीमध्ये चर्चा फार पुढे गेली आहे. प्रकाश आंबेडकर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भाजपाला मदत होईल, असं काही करणार नाहीत. ज्याप्रमाणे मायावती करत आहेत.त्यांना संविधानाचे रक्षण करायचं आहे आणि आम्हाला सुद्धा तेच करायचं आहे. म्हणून आम्ही एकत्र आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

वंचित महाविकास आघाडीत सामील व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय. आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही. आम्ही युतीत होतो. त्या वेळी देखील आमच्या मनासारखं झालं नाही. आता आम्ही महाविकास आघाडीत आहोत. आघाडी धर्म टिकविण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे. शिवसेनेने अनेक महत्त्वाच्या जागा आघाडीमध्ये सोडलेल्या आहेत. प्रकाश आंबेडकरांबरोबर आमची चर्चा उत्तम झाली. काही जागांच्या संदर्भात पुढे चर्चा होईल, असं संजय राऊत म्हणाले.

गृहमंत्र्यांना राऊतांचं पत्र: संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. त्यावर वारंवार मी हे पत्र लिहितो. आमदार गोळीबार करत आहेत. लुटमार, बलात्कार, हत्या सुरू आहेत आणि गुजरातमधून ड्रग्स महाराष्ट्रात येत आहे. नाशिक पुणे मुंबई ठाणे सारख्या शहरात ड्रग्स सापडत आहेत. सरकार काय करत आहे?,असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे.

Share