काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची धडक कारवाई; सात दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांकडून ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत सुरक्षा दलाने सात दहशतवाद्यांचा कंठस्नान घातले आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा व कुलगाम जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दलाशी झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये एकूण सात दहशतवादी ठार झाले. आणखी काही दहशतवादी लपून बसल्याचा संशय असून, दोन्ही ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. पुलवामामध्ये सुरक्षा दलाच्या ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहिमेअंतर्गत रविवारी रात्रीपर्यंत कारवाई सुरू होती. यामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. काश्मीर खोऱ्यात ‘टार्गेट किलिंग’च्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. दहशतवाद्यांविरोधात लष्कराकडून ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवले जात आहे. रविवारी सुरक्षा दलांनी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला होता, तर आज पुलवामा येथे एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.

कुपवाडा येथील सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एकजण प्रतिबंधित ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित पाकिस्तानी होता, तर दुसऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही. याआधी अटक केलेला दहशतवादी शौकेत अहमद शेख याने दिलेल्या माहितीच्या आधारे उत्तर काश्मीरच्या लोलाब भागात दहशतवादी लपलेल्या ठिकाणांचा शोध सुरू होता. त्यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना केलेल्या गोळीबारात हे दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली.

दरम्यान, दक्षिण काश्मीरमधील कुलगाममधील दमहल हांजी पोरा भागात आणखी एका चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. यातील हारिस शेरिफ हा ‘लष्कर-ए-तोयबा’शी व झाकीर पॅडर हा ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे विजय कुमार यांनी सांगितले.

Share