रशिया-युक्रेन युद्धावेळी भारताचा दुसरा मृत्यू

Russia Ukrain War : सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून रशिया या देशाने युद्ध सुरू आहे. युक्रेनमधुन भारतात खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. आज रशिया-युक्रेन युद्धात भारताचा दुसरा बळी गेलाय. तर काल युक्रेनमध्ये गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

युक्रेनमध्ये युद्धात भारतातील दुसऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू आज झाला असल्याची माहिती समोर आली आहे.तो आजारी होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर कालच गोळीबारात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने देश हळहळ व्यक्त करत होता. त्यात आज पुन्हा एक विद्यार्थी गमावल्याने चिंतेचे वातावरण पसले आहे.

युद्धात भारतील अनेकजन युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेकजण युक्रेन सोडून आजुबाजुच्या देशात जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काही ठिकाणी त्यांची अडवणूक होत आहे. युक्रेनमध्ये रशिया आणि युक्रेनियन सैन्याकडून सतत गोळीबाबत, बॉम्बहल्ले, मिसाईल हल्ले होत आहेत. यात आतापर्यंत अनेक युक्रेनियन नागरिक मारले गेले आहेत. यात अनेक युक्रेनच्या सैनिकांचाही मृत्यू झाला आहे.

Share