अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी विरोधक आक्रमक

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाल्याने दोन वर्षांनंतर तीन आठवड्यांचे राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय  अधिवेशन आजपासून सुरु होत आहे.  गेल्या काही दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरु असलेले आरोप-प्रत्यारोप पाहता अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणानंतर अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होईल.

राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी भाजप आमदारांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर विधिमंडळाच्या बाहेर भाजप आमदारांनी मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमकपणे घोषणा दिल्या. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी कथित संबधांमुळे नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपने जोरदार घोषणा दिल्या.

प्रस्तावित विधेयके व अध्यादेश

संयुक्त समितीकडे पाठविलेली विधेयके

सन २०२०चे विधानसभा विधेयक क्र. ५२ – महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये (शक्ति कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरूद्धच्या विवक्षित अपराधांसाठी) विधेयक, २०२० (गुन्ह्यास आळा घालणे आणि गुन्ह्यातील तपास जलद गतीने करण्यासाठी विशेष पोलीस पथके निर्माण करणे, अशा प्रकरणांसाठी स्वतंत्र अनन्यसाधरण न्यायालये निर्माण करून ३० कामकाज दिवसांच्या कालावधीत प्रकरणे निकाली काढण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे) (गृह विभाग) (पुर:स्थापित दि. १४.१२.२०२०, विधानसभेत विचारार्थ दि. १५.१२.२०२०, २३.१२.२०२१

सभागृहाच्या पटलावर ठेवावयाचे अध्यादेश

सन २०२२चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. १.-  मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी (उपकर) आणि महाराष्ट्र ( नागरी  क्षेत्रे ) झाडांचे सरक्षण व जतन (सुधारणा) अध्यादेश, २०२२ (बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ४६.४५ चौ.मीटर (५००चौ.फुट) किंवा त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱ्या निवासी इमारती किंवा गाळ्यांचे मालमत्ता कर माफ करण्याबाबत.

सन 2022 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. 2 .- मुंबई महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश, २०२२(मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करणेबाबत)

प्रस्तावित विधेयके (मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त)

सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्र. १ : उद्योग ऊर्जा व कामगार विभाग – महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०२२. (महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये कलम ३६  नंतर कलम ३६ (अ)  समाविष्ट करण्याचे व सदरहू सुधारणा १० पेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापनांना लागू करण्यासाठी कलम-(१) मध्ये त्याबाबतची तरतूद करण्याचे तसेच सदर अधिनियमातील कलम १७ (छ) मधील आधार कार्ड क्रमांकाबाबतची तरतुद वगळण्याचे प्रस्तावित आहे).

सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्र. २ : नगर विकास विभाग – मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी (उपकर) आणि महाराष्ट्र (नागरी  क्षेत्रे ) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) विधेयक, २०२२(बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ४६.४५  चौ.मीटर (५००चौ.फुट) किंवा त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱ्या निवासी इमारती किंवा गाळ्यांचे मालमत्ता कर माफ करण्याबाबत.) (सन २०२२चा महा. अध्या. क्र .१ चे रुपांतरीत विधेयक)

सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्र. ३ – नगर विकास विभाग – मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२ (मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करणेबाबत) (सन 2022 चा महा. अध्या. क्र. २ चे रुपांतरीत विधेयक)

सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्र. ४ – उच्च व तंत्रशिक्षण विभाग – निकमार विद्यापीठ पुणे विधेयक २०२२

प्रस्तावित विधेयके /अध्यादेश (मंत्रिमंडळाची मान्यता अपेक्षित)

सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक. – महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था (कामकाजाची भाषा) विधेयक, 2022 (स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाची भाषा मराठी असण्याबाबत).

सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्र.   – महाराष्ट्र विनियोजन विधेयक, २०२२.

सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्र.   – महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन विधेयक, २०२२.

Share