शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निधी वितरित मंत्री वडेट्टीवार यांची माहिती

मुंबई : राज्यात जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपस्थितीमूळे नुकसानीसाठी मदत देण्याबाबत २ ऑगस्ट २०२१ रोजी घेतलेल्या मंत्रीमंडाळाच्या निर्णयानुसार १२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

जुलै ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतीपिकांकरीता वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्य निधिमधून जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधित नागरिकांना निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.

 

जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात उद्भभवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीकरिता बाधित नागरिकांना मदतीचे वाटप करण्याकरिता वाढीव दराने राज्य निधीमधून एकूण रु. १२५०७.०१ लाख  निधी विभागीय आयुक्त यांचेमार्फत जिल्ह्यांना वितरीत करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे.

Share