मिशन मजनू चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबईः  ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ सारख्या चित्रपटाच्या निर्मितीनंतर रॉनी स्क्रूवाला आता अमर बुटाला आणि गरिमा मेहता यांच्यासोबत पाकिस्तानच्या भूमीवरील रॉ ऑपरेशन ‘मिशन मजनू’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे.  हा चित्रपट  एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या पोस्टर मध्ये १० जून २०२२ रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

https://www.instagram.com/p/Ca3w7LwP5yW/?utm_source=ig_web_copy_link

‘मिशन मजनू’ सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. या सिनेमात सिद्धार्थ अॅक्शन मोडमध्ये दिसून येणार आहे. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. सिनेमात सिद्धार्थ एका रॉ एजेंटच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सिद्धार्थ आणि रश्मिकाची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात १९७० पाकिस्तानमधील भारताच्या धाडसी मोहिमेची ही कथा आहे, ज्याने दोन्ही देशांमधील संबंध कायमचे बदलले. परवेज शेख, असीम अरोड़ा आणि सुमित बठेजा यांनी लिहिलेली जासूसी थ्रिलर चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​एक रॉ एजेंट म्हणून काम करताना दिसणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना बहुप्रतिक्षित बॉलिवूड चित्रपटाद्वारे पदार्पण करणार आहे. चित्रपट निर्माते शांतनु बागची या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

Share