‘कांजूरमार्ग कारशेड एकापेक्षा जास्त मेट्रो लाईनसाठी वापरणे व्यवहार्य नाही’- किरीट सोमय्या

मुंबईः महाविकास आघाडी सरकारने कांजूरमार्ग येथे स्थलांतर केलेला मेट्रो कारशेड प्रकल्प पुन्हा शिंदे फडणवीस सरकारने आरे येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे तसेच पर्यावरणवाद्यी यांनी मेट्रो कारशेडच्या विरोधात सोमवारी आंदोलन केले होते. राज्य सरकारच्या या निर्णयाला अनेकांकडून विरोध असताना भाजपा नेते किरीट सोमय्यांनी केंद्रीय गृहनिर्माण विभागाने तत्कालिन महाविकास आघाडी सरकारला लिहीलेले पत्र ट्वीट केले आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेड आरे येथे करण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय रद्द केला. हा प्रकल्प आरे येथून कांजूरमार्ग येथे हलविण्यात येणार असल्याचे घोषित केले. यासोबतच आरेतील सुमारे आठशे एकर जमीन राखीव वन म्हणून घोषित करण्यात आली. त्यानंतर १७ मार्च २०२० रोजी केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने तत्कालिन महाराष्ट्र सरकारला तीन पानी पत्र लिहिले होते. या पत्रात आरेतून कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड हलवन्याच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, अशी विनंती केली होती

पत्रात काय म्हटलं होत?
DMRC आणि M/s Systra यांच्या १४ ऑक्टोबर आणि २३ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या बैठकीत कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत कांजूरमार्ग कारशेड एकापेक्षा जास्त मेट्रोसाठी वापरणे व्यवहार्य नाही. या निर्णयावर दोघांनीही सहमती दर्शवली. तसेच कांजूरमार्ग येथे येणाऱ्या दर ३ ते ४ मिनिटींनी येणाऱ्या मेट्रोचे व्यवस्थापन करणे आव्हानात्मक असल्याचे या पत्रात म्हटले आहे. तसेच कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड बनवणे धोकायदायक असेल, त्यामुळे आरेतून कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड बांधण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, असेही या पत्रात म्हटले आहे.

Share