नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करणे चुकीचे -मलिक

मुंबई :  कुठल्याही राजकीय पक्षाने नेत्यांच्या घराबाहेर किंवा राजकीय पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणे योग्य नसून असा पायंडा पडला नाही पाहीजे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मांडली.
 नवाब मलिक म्हणाले की, कुठल्याही राजकीय पक्षाने असे करू नये. यामुळे प्रशासन आणि पोलिसांवर ताण येतो. सर्व पक्षांनी याबाबत निर्णय घेतला पाहिजे. आंदोलन करण्यासाठी जी जागा ठरवून दिली आहे तिथेच आंदोलन केले पाहिजे. कोणत्याही नेत्यांच्या घराबाहेर आणि पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू नये ही आमच्या पक्षाची भूमिका असल्याचं मलिक यांनी सांगितलं. त्यामुळे आता याबाबत काँग्रेस काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मोदींच्या काळात घोटाळेबाजांचा सुळसुळाट

दोन दिवसांपूर्वी २३ हजार कोटींची बँक घोटाळा उघडकीस आला. २०१५ साली याची तक्रार होऊनही सीबीआयने इतकी वर्ष झाली तरी गुन्हा दाखल केला गेला नाही. सीबीआयने याबाबत अतिशय संथगतीने काम केले. मोदींच्या काळात साडे पाच लाख कोटीचे घोटाळे झाले. घोटाळे करणारे परदेशात लपून बसलेत आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही, असा आरोप त्यांनी केला.

Share