जम्मू-काश्मीर: जम्मू आणि काश्मीर आज मोकळा श्वास घेत आहे.यापुढे जम्मू आणि काश्मीरमध्ये फक्त विकास होईल-PM Modi

३७० कलम हटवल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये

Jammu and Kashmir: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरचे आले आहेत. त्यांनी काश्मीर मधल्या जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी याठिकाणी तुमची मनं जिंकण्यासाठी आलो आहे. जोपर्यंत मी तुमची मनं जिंकत नाही तोपर्यंत मी प्रयत्न करत राहीन.

जम्मू आणि काश्मीर येथील विकासाला आता सुरुवात झाली आहे, काश्मीरमध्ये रोजगाराच्या संधी देखील  उपलब्ध होत आहेत. उद्देश चांगला असेल तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. जम्मू-काश्मीरमध्ये जी-२० यशस्वीपणे पार पडले. गेल्या काही वर्षांपासून पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जम्मू-काश्मीर हे देशाचं मस्तक आहे. जम्मू-काश्मीरच्या विकासाचे प्रयत्न केले जात आहेत. जम्मू आणि काश्मीर मध्ये ४० पेक्षा अधिक पर्यटन स्थळ बनवले जाणार आहेत. दोन वंदे भारत ट्रेन धावत आहेत. लोकांसाठी एक नाही तर दोन एम्स हॉस्पिटल निर्माण केले जात आहेत. सात मेडिकल कॉलेज उभारण्यात आलेत. २ कँसर हॉस्पिटलची स्थापना करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरला स्मार्ट बनवण्यासाठी पायाभूत सुविधा वाढवल्या जाणार आहेत, जम्मू-काश्मीरच्या क्रिकेट असोसिएशनच्या चिन्हामध्ये कमळ आहे आणि आमचे चिन्ह देखील कमळ आहे. त्यामुळे हा एक योगायोगच म्हणावा लागेल. क्रिडा क्षेत्राला चालना दिली जात आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

जम्मू आणि काश्मीर आज मोकळा श्वास घेत आहे.यापुढे जम्मू आणि काश्मीरमध्ये फक्त विकास होईल, असं देखील नरेंद्र मोदी म्हणाले.

Share