देवालाही जातीचा दाखला ! योगींवर आव्हाडांनी साधला निशाणा

मुंबई- पाच राज्यांच्या निवडणूका जाहीर  झाल्यापासून निवडणूकीत नवनवीन बदल होतांना दिसत आहे. कोणी पक्षांतर करतय तर कोणी घोषणांचा पाऊस पाडतय . या पार्श्वभूमीवर रोज दावे-प्रतिदावे सुरू आहेत, आता महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसेच, त्यावरून खोचक टोला देखील लगावला आहे.

योगी आदित्यनाथ यांचा व्हिडीओ पोस्ट करत त्यात म्हंटल आहे की, “मला अजिबात दु:ख होत नाही. क्षत्रिय जातीत जन्म घेणं काही गुन्हा नाही. या देशातली एक अशी जात आहे ज्यात खुद्द देवानं देखील जन्म घेतला आहे. आणि वारंवार जन्म घेतला आहे. त्यामुळे आपल्या जातीचा प्रत्येकाला अभिमान असायला हवा”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.

Share