बिग बॉस १५ व्या सिझनचा विजेता कोण?

मुंबईः   छोट्या पडद्यावरिल वादग्रस्त कार्यक्रम आणि लोकप्रिय शो बिग बॉस. आज बिग बॉसच्या चाहत्यांसाठी सगळ्यात मोठा दिवस आहे कारण आज बिग बॉस १५  व्या सिझनचा ग्रॅण्ड फिनाले आहे. यंदाच्या पर्वाचा विजेता घोषित करण्याआधी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही अनेक सेलिब्रिटींचे डान्स परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आजच्या या कार्यक्रमात बिग बॉस १३ चा विजेता आणि दिवंगत अभिनेता सिध्दार्त शुक्लाला  ट्रिब्यूट दिला जाणार आहे.

आजच्या या ग्रॅण्ड फिनालेच्या एपिसोडला  बिग बॉस १३ फेम अभिनेत्री शहनाज गिल, सिद्धार्थची जवळची मैत्रिण उपस्थित राहणार आहे. यावेळी शहनाज सिद्धार्थ शुक्लाला ट्रिब्यूट देत तू यहीं है या गाण्यावर म्हणून डान्स परफॉर्म करणार आहे. या कार्यक्रमाचे काही  व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यात शहनाझ भावूक झालेली पहायला मिळतेय. शहनाज स्टेजवर येताच सलमानतीचे स्वागत केरतो. तेव्हा ती म्हणती तुम्हाला पाहून मागच सगळ आठवतय सलमान तीला सांत्वना देण्यासाठी मिठी मारतो परंतू ती रडू लागते. तीला रडताना पाहून सलमानच्या ही डळ्यात अश्रू येते.

आज बिग बॉस १५ व्या सिझनचा  ग्रॅण्ड फिनाले आहे. हा सिजन प्रेमप्रकरण, खेळासाठी खेळल्या गेलेल्या खेळ आणि वादामुळे मोठ्याप्रमाणात गाजला आहे. यामुळे विजेता कोण असणार याची उस्तुकता दर्शकांना लागली आहे.आज होणाऱ्या ग्रॅण्ड इव्हेंटला ग्रॅण्ड गेस्ट हजेरी लावणार आहे. बिग बॉस १४ ची विनर रुबिका दिलैक, गौहर खान, गौतम गुलाटी, उर्वशी ढोलकिया, श्वेता तिवारी हजेरी लावणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या सिझनच्या ग्रॅण्ड फिनाले धमाल स्वरूपात होणार हे मात्र निश्चित.

सध्या बिग बॉसच्या घरात तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, करण कुंद्रा, रश्मी देसाई, प्रतीक सहजपाल आणि निशांत भट्ट हे स्पर्धक पाहायला मिळतील. ग्रॅण्ड फिनालेच्या आदल्या दिवशीही बिग बॉसच्या घरात ड्रामा पहायला मिळाला. शमिता शेट्टी आणि तेजस्वी प्रकाशची भांडणं झाली तर रश्मी देसाई भावूक झालेली दिसली.

Share