करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ शो होणार बंद

दिग्दर्शक करण जोहर हा बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहे. करणला आपण बऱ्याचवेळा अनेक शोमध्ये सुत्रसंचालन करताना पाहिलं आहे. गेल्या काही वर्षांपासून करण हा ‘कॉफी विथ करण’ या शोमुळे चर्चेत आहे. कॉफी विथ करणचा पहिला भाग २००४ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची वेगळी मांडणी, कलाकारांना एकत्र बसवून त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणे यामुळे हा शो चांगलाच चर्चेत होता. मात्र आता कॉफी विथ करणचा हा प्रसिद्ध टॉक शो बंद केला जाणार आहे. खुद्द करण जोहरने याची घोषणा केली आहे.

करण जोहरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तो म्हणाला, “हॅलो…, कॉफी विथ करणचे तब्बल ६ पर्व हे माझ्या आणि आपल्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. या शो ने प्रत्येकाच्या आयुष्यावर काहीतरी प्रभाव टाकला आहे आणि पॉप कल्चरच्या इतिहासात कुठेतरी एक ठराविक जागा निर्माण केली आहे. पण मला हे सांगताना फार दु:ख होत आहे की, कॉफी विथ करण आता परत कधीच प्रसारित होणार नाही.”

http://<blockquote class=”twitter-tweet”><p lang=”en” dir=”ltr”>IMPORTANT ANNOUNCEMENT <a href=”https://t.co/FfVbIe1wWO”>pic.twitter.com/FfVbIe1wWO</a></p>&mdash; Karan Johar (@karanjohar) <a href=”https://twitter.com/karanjohar/status/1521723870494871553?ref_src=twsrc%5Etfw”>May 4, 2022</a></blockquote> <script async src=”https://platform.twitter.com/widgets.js” charset=”utf-8″></script>

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कॉफी विथ करण हा शो फार चर्चेत आहे. येत्या जून महिन्यांपासून हा शो पुन्हा सुरु होईल असे बोललं जात आहे. या शो मध्ये विकी कौशल, कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यासारख्या नवविवाहित जोड्या सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र करण जोहरने हा शो बंद करत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक चाहते निराश झाले आहेत.

Share