KGF 2′ चित्रपटचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

‘KGF 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट एकामागून एक अनेक विक्रम मोडित काढत आहे. यश स्टारर ‘KGF-2’ला भारतात जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे. यशसह या चित्रपटात अभिनेता संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

दाक्षिणात्य कलाकारांचे जगभरात चाहते आहेत. तर दुसरीकडे बॉलिवूड कलाकारांचा अभिनयही दमदार आहे. हे दोघे पडद्यावर एकत्र आल्यावर धमाका होणार हे नक्की. चला तर मग आज आम्ही तुम्हाला अशा चित्रपटांबद्दल सांगतोय, ज्यात बॉलिवूड आणि साऊथच्या कलाकारांनी एकत्र काम केले आणि ते चित्रपट सुपरहिट ठरले

आरआरआर

हा चित्रपट स्वातंत्र्यसै​​​​​​​निक कोमाराम भीम आणि अल्लुरी सीताराम राजू यांच्या रंजक कथेवर आधारित आहे. या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार राम चरण, ज्युनियर एनटीआर, बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

साहो
हा चित्रपट एका गँगस्टरच्या कहाणीवर आधारित आहे, ज्याच्यामागे पोलिस आणि अंडरवर्ल्डचे लोक असतात. साहोमध्ये साऊथचा सुपरस्टार प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

 

अतरंगी रे
या चित्रपटात सारा अली खान, धनुष आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाची कथा बिहारमधील रिंकू सूर्यवंशी हिच्याभोवती फिरते. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला पडला होता.

Share