‘केजीएफ चॅप्टर २’ ने गाठायलाय यशाचा नवा उच्चांक

Movie review : के जी एफ चॅप्टर २

कलाकार : यश, श्रीनिधी शेट्टी, रवीना टंडन, संजय दत्त, प्रकाश राज, अर्चना जोइस,राव रमेश

दिग्दर्शक / लेखक  : प्रशांत नील

निर्माता : विजय किरगंदूर

रिलीज डेट : १४ एप्रिल २०२२

रेटिंग : ४ / ५

काही वर्षापूर्वी बाहुबलीची चर्चा देशभर होत होती त्यानंतर ‘काला’, ‘बाहुबली २’, ‘केजीएफ’, ‘कबाली’, ‘मारी २’, ‘विक्रम वेधा’, ‘साहो’, ‘मास्टर’, ‘जय भीम’ सारखे किती तरी सुपरहिट चित्रपट आले आणि प्रेक्षकांचा कल दक्षिण भारतीय सिनेमाकडे झुकला त्यानंतर आता ‘पुष्पा’ ‘आरआरआर’ नंतर आलेल्या  ‘केजीएफ चॅप्टर २’ ने यशाचा नवा उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे

या चित्रपटाच्या कथेविषयी सांगायच झाल तर रॉकी भाईचा अंदाज  आणि अधिराची भूमिका साकरणाऱ्या संजय दत्तची भीती या दोन्ही गोष्टी कमाल आहेत. या चित्रपटाच्या कथा कल्पनाविस्तार असली तरीही प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात या कुठे ही कसर राहिलेली नाही. अॅक्शनवाल्या मारधाड सीन सोबतच रॉकीच त्याच्या आई सोबत असलेल प्रेमाच नात या चित्रपटाला एक इमोशनल टच देऊन जात.
लहानपणी परिस्थिती आणि अन्यायानं पिचलेला-दबलेला रॉकी भाई केजीएफ मिळवल्यानंतर मसीहा, बिझनेसमॅन आणि गँगसस्टर म्हणून ओळखला जातो. आता चित्रपटात तो निडर होऊन स्वतः जगतजेत्ता होण्याचं स्वप्न तो बाळगून आहे. गरिबीमुळे आई गमावलेला रॉकी त्याच्या आईला दिलेल्या एका वचनासाठी स्वतःचं मोठं साम्राज्य उभं करु पाहतोय. केजीएफ ही सोन्याची खाण मिळवण्यासाठी आणि स्वतःकडेच अबाधित ठेवण्यासाठी त्याचा आटापिटा सुरू आहे. या वेळी अधिरा त्याचा सर्वात मोठा शत्रू बनून त्याच्या समोर उभा राहतो. या दोघांच्या भांडणात कोण धारातीर्थी पडेल? सोन्याची लंका असलेल्या केजीएफचं साम्राज्य कसं मातीमोल होतं? या सगळ्यांची प्रश्नांची उत्तर तुम्हाला या सिनेमात टप्याटप्यानं मिळतील.

प्रत्येक घटनेला भूतकाळ आणि भविष्याचे पाश जोडलेले आहेत. ज्यामुळे कथानकाचा विस्तार अधांतरी वाटत नाही.या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी,प्रशांत नील यांच डीयरेक्शन,स्टोरी,अॅक्टिंग सगळच दमदार आहे.
या चित्रपटात बऱ्याच लहान-मोठ्या व्यक्तिरेखा आहेत पण सगळ्याच व्यक्तिरेखाना तितक्याच बारकाईनं पडद्यावर उभं केलंय. ‘पैसा वसूल करणारा ‘ हा चित्रपट आहे.

अधिराच्या भूमिकेत असलेल्या संजय दत्तचं विशेष कौतुक करायला हवं तर दुसरीकडे पंतप्रधान रामिक सेनच्या भूमिकेत असलेल्या रविना टंडननं प्रत्येक बॉलवर अभिनयाचे चौकार-षटकार मारले आहेत. सिनेमात तिच्या व्यक्तिरेखेला जास्त वेळ मिळालेला नसला तरी रविना टंडनने या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. या सगळ्यात चित्रपटाच्या यशात बॅकग्राऊंड म्युझिकचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आवर्जून पाहावा असा हा चित्रपट आहे.

 

Share