रेसलरच्या आखाड्यातील खली राजकारणात चितपट करण्यासाठी सज्ज

नवी दिल्ली :  पंजाब विधानसभा निवडणुकाची पार्श्वभुमिवर भाजपला मोठे यश मिळाले आहे. WWW रेसलर्स दलीप सिंग राणा उर्फ ​​द ग्रेट खलीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दलीप सिंग राणा यानं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह,खा. सुनीता दुग्गल यांनी त्यांच्या उपस्थित त्याने पक्षात प्रवेश केला. खली लवकरच पंजाबमध्ये भाजपचा प्रचार करताना दिसणार आहे.

भाजमध्ये प्रवेश केल्यानंतर खली म्हणाला की, भाजपमध्ये प्रवेश करुन मला खूप चांगलं वाटतंय.  WWW मध्ये मला नाव आणि संपत्तीची कमी नव्हती. पंतप्रधान मोदींनी देशासाठी केलेले काम पाहून मी भाजपमध्ये प्रवेश केलाय. देशाच्या प्रगतीच्या या प्रवासात आपणही का सहभागी होऊ नये असा विचार  माझ्या मनात आला. भारताला पुढे नेण्याचे भाजपचे धोरण आहे. त्यामुळं प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केलाय. जर पक्षानं भविष्यात मला कोणतीही जबाबदारी दिली तर मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न असेल.

Share