निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का,या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई- औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांच्यासह पाच नगरसेवकांनी आणि बाजार समितीचे माजी संचालकांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला . आगामी काळात नगरपालिका निवडणूकीसाठी राष्ट्रवादीत इनकमिंग सुरु झाले आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले की,  आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आपल्यासाठी महत्वाच्या आहेत . आपल्याला परभणी, औरंगाबाद यांसारख्या जिल्ह्यात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आगामी काळात आपल्याला बेरजेचे राजकारण करावे लागणार असून इतर पक्षांमधील नेते राष्ट्रवादीत येण्याची ईच्छा व्यक्त करत आहेत. त्यानुसार ते प्रवेश होतील. औरंगाबादमध्ये विधानसभेच्या नऊ जागा आहेत त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही, ही आमची खंत आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीचा आमदार निवडून येतो. मात्र, विधानसभेला एकही सदस्य निवडून येत नाही, याबाबत विचार करण्याची गरज आहे अशी खंत व्यक्त करत आगामी निवडणूकीत कसे यश संपादन करता येईल याकडे लक्ष द्या असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

Share