दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्या कालच्या पत्रकार परिषदेत थेट घोटाळ्याचे आरोप केले. त्यानंतर या आरोपांवर भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील आरोपांसंबंधी बोलताना सिद्ध करा, नाही तर जोड्याने मारेन असा इशारा राऊतांनी दिल्यानंतर किरीट सोमय्यांनी यावर उत्तर दिलं आहे. दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सोमय्यांनी आपली चप्पलच हातात उचलून घेतली आणि संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
मला जोड्याने मारणार असाल तर मी तयार आहे. मी संजय राऊत यांना माझा जोडा देतो. त्यांनी रश्मी ठाकरेंच्या १९ बंगल्यांसंबंधी जे पुरावे दिले आहेत त्यासंबंधी त्यांना विचारावं. जर त्यांनी कर भरल्याचा, अर्ज केल्याचं वैगैरे अमान्य केलं तर एक नाही तर दोन्ही जोडे मारा,” असं किरीट सोमय्या म्हणाले.
संजय राऊत काय म्हणाले
संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांच्यावर आरोप करत म्हणाले की, “कोलराई गावात १९ बंगले बांधून ठेवले आहेत. माझं आव्हान आहे की, कधीही सांगा आपण चार बसेस करु आणि १९ बंगल्यांमध्ये पत्रकारांची पिकनिक काढू. जर बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन. जर दिसले नाहीत तर संपूर्ण शिवसेना सोमय्यांना जोड्याने मारेल. दिशाभूल, खोटेपणाचा कळस, भंपकपणा करायचा कशासाठी,” असं संजय राऊत म्हणाले.