‘बाप बेटे जेलमध्ये…’ट्विटवरुन मोहित कंबोज यांच प्रत्युत्तर

मुंबईः  शिवसेनेचे खासदार  संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचे खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. यानंतर आज त्यांनी पुन्हा ट्विट करत बाप बेटे जेलमध्ये जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यावर आता ट्विट करत प्रत्युतर भाजपचे नेते मोहीत कुंबोज यांनी दिल आहे.

मोहित कुंबोज म्हणाले, “सलीम आणि जावेद दोघंही तुरुंगात जाणार आहेत. थांबा आणि वाट पाहा.”

मोहित कंबोज यांनी सलीम जावेदची जोडी जेलमध्ये जाणार असा आरोप केला आहे. त्यांनी संजय राऊत यांचा उल्लेख जावेद असा, तर नवाब मलीक यांचा उल्लेख सलीम असा केला. कंबोज यांनी काल पत्रकार परिषद घेत राऊतांच्या पत्रकार परिषदेला प्रत्यतर दिल.

संजय राऊत तुमची निष्ठा कुणाबरोबर? ठाकरे की पवार? -मोहित कंबोज
मोहित कंबोज म्हणाले, पत्रकार परिषदेत मोहित कंबोजला मी ओळखत नाही असे संजय राऊत म्हणाले. परंतु दरवर्षी गणपतीसाठी संजय राऊत माझ्या घरी आले आहे. एवढच नाही तर राऊतांना गरजेची अनेकवेळा मी अर्थिक मदत देखील केली आहे. संजय राऊत यांचा स्मृतीभ्रंशाचा आजार झाला आहे. त्यामुळे कदाचीत त्यांच्या लक्षात नसेल राऊतांनी मला फडणवीसांवर माझी निष्ठा असल्याचे म्हटले आहे. फडणवीसांवर निष्ठा असणे हे माझे सौभाग्य आहे. परंतु राऊतांनी त्यांची निष्ठा नक्की शरद पवार की उद्धव ठाकरे यांच्यापैकी कोणासोबत आहे हे स्पष्ट करावे. सध्या संजय राऊतांची अवस्था सध्या घर का ना घाटका अशी झाली आहे.

संजय राऊत म्हणाले पत्रा चाळ जमिनीत कंबोजचा पैसा आहे. याविषयी बोलताना कंबोज म्हणाले ती जागा माझ्या कंपनीने रितसर खरेदी केली होती. त्यात माझे पैसे बुडाले. त्याची मी रितसर तक्रार दाखल केली आहे आजवर त्या जागेचा पुनर्विकास झालेला नाही. गुरूआशिष कंपनीविरोधात आमच्या तक्रारीवरूनच गुन्हा दाखल झाला आहे. कोणतीही माहिती नसताना संजय राऊतांनी खोटेनाटे आरोप करणं बंद करावे. तसेच पत्रकार परिषदेपूर्वी अभ्यास करण्याची गरज आहे.

प्रवीण राऊतनं मनी आणि पावरचा वापर करत वसईतील जागा मुंबईतील एका प्रतिष्ठीत विकासकाला दिली आहे हे सारं संजय राऊतांच्या आशीर्वादाने झालं आहे. त्यात संजय राऊतांना किती मिळाले? याचं त्यांनी उत्तर द्यावं. तसेच ५ हजार कोटींची जागा १५००० कोटींना विकली. संजय राऊत आणि हयातचा काय संबंध? राजकुमार गुप्ता कोण हे देखील त्यांनी सांगावे. राजकुमार गुप्ता – वंदना गुप्ता हे सोन्याची तस्करी करतात. त्यांच्याकडूनं संजय राऊतांनी रोख पैसे घेतले आहेत. दाऊद – हसीना पारकर यांचे मुंबईत कोणशी संबंध आहेत? आज मुंबईत छापेमारी सुरू आहे त्यावर का नाही बोललात? असा सवाल देखील कंबोज यांनी केला आहे.

Share