आघाडीत बिघाडी; सत्तारांच्या आदेशाला थोरांतांची स्थगिती

औरंगाबाद  :  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जिन्सीतील भूखंड विक्रीचा व्यवहारात अपहार आढळल्याने महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी चौकशीचे आदेश दिले होेते. त्या आदेशावर राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्थगिती दिली आहे. यामुळे आता आघाडीतील राजकीय संघर्ष पेटण्याची शकत्या राजकीय वर्तूळात बोलली जात आहे.

बाजार समितीने जिन्सीतील जमीन समितीचे नियम बाजूला ठेवत विकली आणि त्यात घोटाळा झाल्याची तक्रार डाॅ.दिलावर मिर्झा बेग यांनी राज्यमंत्री सत्तार यांच्याकडे केली होती . तसेच जयमलसिंग रंधवा व पुंडलिकअप्पा अंभोरे यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे ही तक्रार केली होती. या प्रकरणी सत्तार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते. अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीने चौकशी पूर्ण केली होती. आता प्रतिक्षा होती फक्त अहवालाची. या चौकशी आदेशाविरुद्ध औरंगाबाद बाजार समितीच्या वतीने सचिव विजय शिरसाठ यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अर्धन्यायिक न्यायालयाकडे पुनर्विलोकन अर्ज केला होता. पण संचालकांच्या संमतीने सदरील व्यवहार झाला आहे. सहकारमंत्र्यांकडे अगोदरच चौकशी सुरु असल्याची बाबींकडे दुर्लक्ष करुन सत्तारांनी चौकशीचे आदेश दिलेत.

वेगवेगळ्या न्यायालयात एकाच प्रकरणाची समांतर चौकशी अयोग्य आहे. यातून बाजार समितीचे मोठे नुकसान होईल, असा युक्तिवाद महसूलमंत्री थोरातांकडे करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य धरुन शेवटचा निर्णय येईपर्यंत राज्यमंत्री सत्तारांच्या आदेशास स्थगिती देण्याचे आदेश महसूलमंत्री थोरात यांनी दिले आहेत.

Share