निवडणूकीच्या वेळी मतदान केल्यानंतर बोटाला शाई लावली जाते हि शाई सहजासहजी का निघत नाही ? हा प्रश्न प्रत्येकाला नेहमी सतवत असेलच. या शाईला अनेक वान देखील आहेत . इलेक्टोरल इंक , वोटर्स इंक, पोल इंक अशी नाव या शाईला पडली आहेत. या शाईचं वेगळेपण म्हणजे एकदा का ही शाई बोटांवर लावली की ती बऱ्याच दिवस निघत नाही. यामुळे एकाच व्यक्तीकडून वारंवार मतदान करणे किंवा इतर गैरप्रकार टाळण्यास मदत होते. मात्र, ही शाई एकदा बोटावर लावली की साबण असो की हँडवॉश कशाचाही उपयोग करून हि शाई निघत का नाही ? ही शाई सहजासहजी निघत का नाही?
इलेक्टोरल इंक पाण्याच्या संपर्कात आली की तिचा रंग बदलतो. सुरुवातीला बोटाला लावताना जांभळ्या रंगाची ही शाई नंतर काळपट होते आणि बोटावर एक दाग सोडते. या शाईत सिल्व्हर नायट्रेट असतं. हे सिल्व्हर नायट्रेट त्वचेतील प्रथिनांसोबत (प्रोटिन्स) प्रक्रिया करून एक बाँड तयार करते. त्यामुळे शाई प्रकाशाच्या किंवा पाण्याच्या संपर्कात येताच तिचा रंग बदलून दाग तयार होतो. हा दाग साबण, हँडवॉश किंवा इतर कोणत्याही रासायनिक पदार्थाचा उपयोग केला तरी अनेक दिवस पुसला जात नाही.
या शाईचा दाग त्वचेतील मृत पेशी गेल्या नंतर नवीन पेशी तयार झाल्यावर या शाईचा दाग हळूहळू जातो. या शाईची क्षमता त्या शाईतील सिल्व्हर नायट्रेटच्या प्रमाणावर ठरते. शाईतील सिल्व्हर नायट्रेटचं प्रमाण ७ टक्क्यांपासून २५ टक्क्यांपर्यंत असते.
मैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड या कंपनीने या शाईचा शेध लावला आहे.या कंपनीने निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष होण्यासाठी ही शाई बनवण्याची प्रक्रिया गुप्त ठेवली आहे. आज जगातील तुर्कस्तान, नायजेरिया, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, नेपाळ, घाना असे तब्बल २८ देश या अमिट शाईचा आपल्या निवडणुकीत वापर करतात.
शाईचा इतिहास-
देशात पहिली निवडणूक १९५२ साली घेण्यात आली होती. त्यावेळी या शाईचा उपयोग गेला जायचा नाही. १९६२ साली प्रथम ह्या शाईचा उपयोग निवडणूकी वेळी करण्यात आला. मैसूर येथील निवडणूकीत प्रथम हि शाई वापरण्यात आली. तेव्हापासून या शाईला मान्यता देत भारतीय निवडणूक आयोगाकडून लागू करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूकी वेळी होणारा अनूचित प्रकार रोखला गेला.