रेफ्रिजरेटरचा वापर करत असाल तर व्हा आता सावध

भाजीपाला आणि फळे बाजारातून आणल्या वर आपण ते रेफ्रिजरेटर मध्ये ठेवतो.कारण ते जास्त वेळ ताज्या आणि बऱ्याच काळ टिकुनही राहतात.अनेकजण आठवडाभराच्या भाज्या किंवा फळे आणतात आणि रिफ्रिजरेटरमध्ये ठेवता, ज्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका कमी होतो.पण तुम्हाला माहित आहे का सर्वच फळे रेफ्रिजरेटर मध्ये ठेवू नये. रिफ्रिजरेटरमध्ये ठेवलेल्या फळांची चव बदलते.काही फळे रिफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने आरोग्यावर काही दुष्परिणाम देखील होवू शकता.

कोणती फळे रिफ्रिजरेटरमध्ये ठेवू नये

  • केळी उप-उष्णकटिबंधीय भागात केळी उगवते जेथे हवामान उबदार असते. केळीवर जास्त उष्णतेचा परिणाम होत नाही. जर तुम्हाला केळी काही दिवस साठवायची असतील आणि फ्रीजमध्ये ठेवायची असतील तर ते थंड होण्याने लवकर खराब होतील. फ्रीजच्या थंडीमुळे केळी काळे होतात, त्यामुळे ते लवकर सडू लागतात.
  • संत्री रिफ्रिजरेटरमध्ये संत्री ठेवल्यास थंडीची (म्हणजे सर्दी थंडी वाजणे) तक्रार होऊ शकते. तसेच लिंबू आणि मोसमी ही ठेवू नये.
  • सफरचंद यात सक्रिय एंजाइम असतात, ज्यामुळे सफरचंद थंड ठिकाणी जलद पिकू शकतात. सफरचंद उन्हाळ्यात थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवल्यास ते कागदात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा.
  • रिफ्रिजरेटरमधील शिळे अन्नही खावू नये या मुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होवू शकतो.
Share