CM बद्दल बोलाल, तर PMची आठवण करून देऊ; दीपाली सय्याद यांनी भाजपला पुन्हा डिवचलं

मुंबई : भाजप नेत्यांवर केलेल्या टीकेवरुन शिवसेना नेत्या दीपाली सय्यद गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आहेत. दोन दिवसांपूर्वीच दीपाली सय्यद यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती. यावर आता भाजपकडून काल ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर आज पुन्हा एकदा दिपाली सय्याद यांनी ट्विट करत भाजपला ललकरालं आहे.

दीपाली सय्याद यांनी ट्विट मध्ये म्हटलं की, अंगावर आलात तर आम्ही शिंगावर घेऊ. मुख्यमंत्र्या बद्दल बोलाल तर पंतप्रधानांची आठवण करून देऊ. दिल्लीत हुजर्या करणार्यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवुन देऊ. दिल्लीसमोर महाराष्ट्र झुकणार नाही. मोडेल पण वाकणार नाही. जय महाराष्ट्र… असं ट्विट दीपाली सय्यद यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले होते. त्यानंतर दीपाली सय्यद यांच्याविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दीपाली यांनी ट्विट करत पंतप्रधानांवर जोरदार टीका केली होती. त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं.

भाजपमध्ये घोटाळेबाज मंत्र्यांना पाठिंबा दिला जातो असं म्हणत त्यांनी मोदींवर टीका केली होती. “किरीट सोमय्याने आरोप केल्यानंतर मंत्री बीजेपीमध्ये जाऊन पवित्र होतात. मग पंतप्रधान त्यांना पाठिंबा देतात. त्यांच्या घोटाळ्याबाबत नंतर त्यांना कुणीच काही बोलत नाही. असा —- (आक्षेपार्ह शब्द) पंतप्रधान अख्ख्या भारताने पाहिला नसेल”, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Share