तुझ्यात जीव रंगला ! अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीचा पार पडला साखरपुडा

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या राणादा आणि पाठकबाई आता ख-या आयुष्यात पती-पत्नी होणार आहेत. अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर लवकरच लग्नाच्या गाठीत अडकणार आहेत. तत्पूर्वी 3 मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या दोघांनी साखरपुडा केला. अक्षयाने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना सुखद धक्काच दिला.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून हे दोघे अतिशय लोकप्रिय झाले आहेत. आता ख-या आयुष्यात हे दोघे म्हणताहेत ‘तुझ्यात जीव रंगला…’अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी या दोघांचे साखरपुड्याचे फोटो समोर आले आणि चाहत्यांना एक सुखद धक्काच मिळाला. यापूर्वीही अक्षया आणि हार्दिक यांनी अनेकदा दोघांचे एकत्र असलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, पण कधीही आपल्या नात्याविषयी कुणालाही कळू दिले नाही .

तिने अक्षयाचा ‘अ’ आणि हार्दिकचा ‘हा’ ही आद्याक्षरं वापर कॅप्शन दिले आहे. तिचे हे कॅप्शनदेखील लक्ष वेधून घेत आहे.

अक्षयाने साखरपुड्याचे खास फोटो शेअर करत त्याला ‘अहा ऽऽऽ’ असे हटके कॅप्शन दिले आहे.
अक्षया गाणी गात त्याला अंगठी घालत आहे. त्यानंतर ते दोघेही एकमेकांना मिठी मारत फोटोसाठी पोज देताना दिसत आहे.
या दोघांच्या साखरपुड्याचे खास फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. अगदी स्वप्नवत वाटावा असा दोघांचा साखरपुडा पार पडला आहे.
हार्दिकने शेअर केलेल्या व्हिडिओत तो अक्षयला प्रपोज करत अंगठी घालताना दिसत आहे.
Share