१८ जानेवारी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांना सावर्जनिक सुट्टी जाहीर

मुंबई :  येत्या १८ जानेवारी २०२२ रोजी राज्यातील ९५ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूका, २ जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणूका तसेच सांगली- मिरज- कुपवाडा महानगरपालिका पोटनिवडणूकांसाठी सदर क्षेत्रातील मतदारांना दिवशी मतदान करण्यासाठी संबधित मतदारसंघात सार्वजिक सुट्टी देण्याचे सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले आहे.

मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ही सार्वजनिक सुट्टी खाली नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निम शासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बॅंका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे.

या जिल्ह्यात होणार निवडणूका  

राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाळ, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, आणि गडचिरोली जिल्ह्यांतील ९५ नगरपंचायतींकरिता तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी ७ पंचायत समित्या आणि सांगली- मिरज- कुपवाडा या एका महानगरपालिकेच्या पोटनिवडणूकांकरिता ही सार्वजनिक सुट्टी असेल, असं सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलं आहे.

Share