लसीकरणाची गती वाढविण्यासाठी नियोजन करा- भुजबळ

नाशिक : तिसऱ्या लाटेत कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव अधिक जलद गतीने वाढत आहे. या वाढणाऱ्या रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाची गती वाढविण्यासाठी नियोजन करण्यात यावे. असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ऑनलाईन कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी भीमराज दराडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कप‍िल आहेर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, उपजिल्हाधिकारी नितिन मुंडावरे, ज्योती कावरे, निलेश श्रींगी यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, तिसऱ्या लाटेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक जलद गतीने वाढत आहे. या लाटेतील आजाराची लक्षणे सौम्य असल्याने ज्यांनी लसीकरण केले आहे त्यांना याचा धोका कमी जाणवतो. त्यामुळे नागरिकांना लसीकरणाचा दुसरा डोस देण्यासाठी नियोजन करून १०० टक्के लसीकरण होण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात यावे. शहरी भागातील लसीकरणावर भर देण्यात यावा, अशा सूचनाही पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.

Share