गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली

नवी दिल्लीः गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळच्या सुमारास ८.१२ वाजता निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता दीदींच्या प्रकृतीतही सुधारणा होत होती, मात्र शनिवारी प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानं आपल्या देशात एक पोकळी निर्माण झाली आहे जी भरली जाऊ शकत नाही. येणाऱ्या पिढ्या त्याचं भारतीय संस्कृतीतील एक मोठं नाव म्हणून स्मरण ठेवतील, लतादीदींच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. सायंकाळी साडेसहा वाजता शिवाजी पार्क इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान ४ वाजता मुंबईत दाखल होणार आहेत.

 

मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे. प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या लतादीदी आम्हाला सोडून गेल्या. त्या सोडून गेल्यानं एक पोकळी निर्माण झालीय, जी कधीही भरून येणार नाही. येणाऱ्या पिढ्या त्यांना भारतीय संस्कृतीतल्या एक दिग्गज म्हणून स्मरणात ठेवतील. त्यांच्या मधूर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

भारतरत्नसह विविध पुरस्कारांनी सन्मान

लता मंगेशकर यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी अनेकांना प्रार्थना केली होती. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना ‘लता दीदी’ म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, २० हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले आहे. २००१ साली लता मंगेशकर यांना ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना १९८९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.

 

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Share