महाराष्ट्राला “वेड्यात” काढलं जातंय – जितेंद्र आव्हाड

मुंबई : महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात अभिनेता अक्षयकुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. या लुकवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत चित्रपट निर्मात्यांवर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, ‘जर्मनी,पॅरिस, अमेरिका येथे संग्रहालयात असलेली ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकालीन चित्र आहेत. त्यावरुन शिवाजी महाराजांची साधारणत: आपल्याला कल्पना येते. चित्रपट येतोय… ‘वेडात मराठे वीर दौडले सात’. त्यामधील शिवाजी महाराज बघितल्यावर महाराष्ट्राला “वेड्यात” काढलं जातंय असं वाटतं.’जितेंद्र आव्हाड यांच्या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधलं.

दरम्यान, वेडात मराठे वीर दौडले सात” या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे. या चित्रपटात अक्षयसोबतच अभिनेता प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्या मांजरेकर, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलगू भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे.

Share