मालिकांच्या अटकेविरोधात ठाण्यात महाविकास आघाडीची निदर्शने

ठाणे : महाविकास आघाडीच्या वतीने आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईडी आणि केंद्र सरकारच्याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारकडून विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी सीबीआय, एनआयए, आयकर विभाग, आणि ईडी या तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. असा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे.
आनंद परांजपे पुढे बोलताना म्हणाले की, आता लढा सुरु झालेला आहे. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरले आहेत. ज्यावेळी ईडी अस्तित्वात नव्हती त्यावेळी घडलेल्या कृतीला आता लक्ष्य केले जात असेल तर त्यामध्ये राजकारण नाही का? ईडीच्या धाडी कोणाच्या घरावर पडणार आहेत हे भाजपावाल्यांना आधीच कळते. म्हणजेच ईडी ही भाजपाकडूनच चालविली जात असल्याचा आरोप परांजपे यांनी केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला, मिलींद पाटील,  प्रमिला केणी, सुहास देसाई,  वहिदा खान, नगरसेविका अपर्णा साळवी, सुनिता सातपुते, अंकिता शिंदे, आरती गायकवाड, परिवहन सदस्य नितीन पाटील, मोहसीन शेख, काँग्रेसचे सरचिटणीस सचिन शिंदे, राहुल पिंगळे, राजेश जाधव , रमेश इंदिसे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
Share