पत्राचाळ घोटाळा प्रकरण: संजय राऊतांचा जामीन रद्द होणार?

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता राऊतांचा जामीन कायम राहणार की रद्द होणार? याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत पीएमएलए कोर्टानं ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दिवाणी खटल्यासाठी पीएमएलए कायदा लागू केला असल्याचे ताशेरे कोर्टाने ओढले होते. त्यानंतर राऊतांची ९ नोव्हेंबर २०२२ ला सुटका करण्यात आली होती. त्यांच्या सुटकेनंतर जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.

Share