मलिक यांनी बांगलादेशातून मुली आणून वेश्याव्यवसाय केला ; भाजप नेत्याचा आरोप

मुंबई :   राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना दाऊद इब्राहिमशी संबंधित जमिनीच्या व्यवहार प्रकरणी करण्यात अटक करण्यात आली आहे. याबाबद त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आले आहे. यानंतर या सर्व प्रकरणाबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. काल  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी व्यवहार करणाऱ्या मंत्र्यासोबत अख्ख सरकार उभ राहत असल्याचा संदेश देशभरात जाईल, अशी टीका फडणवीस यांनी केलाय. तर आता भाजपचे नेते मोहीत कंबोज यांनी मलिक यांच्यावर पत्रकार परिषद घेत आणखी एक धक्कादायक आरोप केला आहे. नवाब मलिकांवर चक्क वेश्याव्यवसाय करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

मोहीत कंबोज म्हणाले की, नवाब मलिक हे पूर्वी डान्सबार चालवायचे. त्यांनी अनेक बांगलादेशी मुलींना भारतात आणून वेश्या व्यवसायात ढकलले होते, आम्ही यासंदर्भात अनेक मुलींची स्टिंग ऑपरेशन्स केली आहेत. यामध्ये त्या मुलींनी नवाब मलिका यांनी आपल्याला जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलल्याची कबुली दिली आहे. हे पुरावे लवकरच मी हे सगळे व्हिडीओ येणाऱ्या काळात तपासयंत्रणांना देणार असल्याचे मोहित कंबोज यांनी सांगितले.

एक मंत्री ड्रग्जमध्ये, एवेश्या व्यवसायात सामील आहे, त्याच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध अससल्याचा आरोप, बेनामी आणि भ्रष्टाचारी संपत्ती आहे. हे भयंकर आहे. आजच्या आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.

Share