मलिक यांनी अंडरवर्ल्डच्या माणसांकडून जमीन घेतली; फडणवीस

मुंबई :  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना दाऊद इब्राहिमशी संबंधित जमिनीच्या व्यवहार प्रकरणी करण्यात अटक करण्यात आली आहे. याबाबद त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आले आहे. यानंतर या सर्व प्रकरणाबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या असून विविध नेतेमंडळी आपआपली प्रतिक्रिया देत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर काही आरोप केले आहेत

फडणवीसांनी केलेले आरोप

  • हा संपूर्ण प्रकार गंभीर आहे. एनआयएच्या ऑपरेशन्समध्ये एक मोठी लिंक मिळाली, ज्यातून रियल इस्टेटचे व्यवहार हे मनी लॉड्रींगच्या माध्यमातून होत आहेत, हे लक्षात आले. ९ ठिकाणी सर्च केल्यानंतर काही बाबी पुढे आल्या. त्यातील एक प्रकरण हे मंत्री नवाब मलिक यांचे आहे.
  •  मंत्री नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डच्या माणसांकडून जमीन घेतली. ज्यांची मालकी त्यांनी सांगितले की, त्यांना एकही पैसा मिळाला नाही. जेथे हसिना पारकर सौदा करीत होती, त्यांनी सुद्धा या प्रकरणात बयाण दिले आहेत.
  • मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत महाराष्ट्रातील मंत्र्याने व्यवहार करण्याचे कारण काय? जे लोक मुंबईत बॉम्बस्फोट करतात, अशांना या व्यवहारातून पैसे दिले जात असतील, ते अतिशय गंभीर आहे.
  • कोट्यवधीच्या रकमेच्या या सौद्यातील ५५ लाख रूपये हे हसिना पारकरला मिळाले. कुठल्याही राजकीय पक्षाने राजकारण न करता, अशाप्रकाराला थारा देण्याची गरज नाही. उलट ईडीच्या कारवाईचे सर्वांनी समर्थन करायला हवे. देशाच्या शत्रूशी व्यवहार करण्याचे कारण काय?
  • मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींचे बयाण ईडीने कारागृहात जाऊन घेतलेले आहे. देशाच्या शत्रूला मदत करणार्‍यांची गय केली जाऊ नये. माझ्याकडे जितके पुरावे होते, ते मी सर्व यंत्रणांना दिले होते. मंत्र्यांचा राजीनामा घेणार नसतील, तर राजकारणाचा स्तर खालावेल.
    देशाच्या शत्रूला मदत करणारे मंत्रिमंडळात राहतात, पूर्ण सरकार त्याच्या पाठिशी उभे राहते, याचा देशात संदेश चांगला जाणार नाही.
  • महाविकास आघाडी सरकार कसे खोटे पुरावे, साक्षी गोळा करतात, यासंदर्भात येत्या काही दिवसांत मोठा खुलासा करणार.
Share