मणिपूरः उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. आज दुपारपर्यंत सर्वच राज्यातील निकाल स्पष्ट होणार आहे. मणिपूरमधील निकालांचीही उत्कंठा वाढत आहे. पहिल्या तासाभरातील मतमोजणीचे निकाल पाहता येथे भाजपने दणदणीत आघाडी घेतल्याचे चित्र आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत काँग्रेस काहीसा पिछाडीवर जातोय, असे दिसतेय. त्यापेक्षा अपक्ष उमेदवारांनीच १० जागांवर आघाडी घेतल्याचे चित्र होते. त्यामुळे मणिपूरमध्ये काँग्रेसची धाकधूक वाढली आहे.
मणिपूरमध्ये सत्तेसाठी चुरस
मणिपुरमध्ये सर्व ६० जागांचे ट्रेंड हाती आले आहेत. भाजप सर्वाधिक २५ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस १४ जागांवर पुढे, एनपीएफ (नागा पीपल्स फ्रंट) ४, एनपीपी (नॅशनल पीपल्स पार्टी) ११ आणि इतर ६ जागा
मणिपुरमध्ये २०१७ मध्ये काय होती स्थिती?
मणिपुरमध्ये २०१७ मध्ये भाजपने स्थानिक पक्षांशी युती करत पहिल्यांदा सत्ता स्थापन केली होती. काँग्रेस २८ जागा मिळवत नंबर एकचा पक्ष बनला. तर भाजपला २१ जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. पण भाजपने एनपीपी आणि एनपीएफ पक्षांना सोबत घेत सत्ता काबीज केली.
२०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने २६ जागा जिंकल्या तर काँग्रेसला २० जागा मिळाल्या. त्याचवेळी एनपीएफला ११ आणि इतरांना तीन जागा मिळाल्या.